Duration 9:3

Surmai Masala Fry | सुरमई मसाला फ्राय | Recipe in marathi | EP : 38

211 watched
0
24
Published 19 Jun 2020

साहित्य: एक सुरमई मच्छी एक लिंबू एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन-तीन चमचे धने पावडर तीन ते चार चमचे लाल मिरची आठ ते दहा कश्मिरी मिरच्या एक कांदा आठ-दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन चमचे बेसन पीठ तेल चवीनुसार मीठ कृती: सर्वप्रथम मच्छी व्यवस्थित साफ करून धुवून घ्या.त्यानंतर मच्छीच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सुरीच्या साह्याने काप करून घ्या. त्यानंतर मच्छी वर थोडीशी हळद, मीठ आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्या. आणि व्यवस्थित सर्व मच्छी ला लावून घ्या.आता हळद,मीठ आणि लिंबाचा रस व्यवस्थित लावल्यावर मच्छी दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्या. आता मसाला तयार करण्यासाठी मिक्सर चे भांडे घ्या. त्यामध्ये अर्धा ते एक तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या कश्मिरी मिरच्या, कांदा, लसून आणि आलं टाकून घ्या.आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्या. त्यानंतर बारीक झालेल्या मसाल्यांमध्ये हळद,धने पावडर,गरम मसाला,लाल मिरची पावडर बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या.त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकून हे सर्व बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी टाकून एक पेस्ट तयार करून घ्या. आता ही पेस्ट मच्छी ला सर्व बाजूंनी लावून घ्या. त्यानंतर मसाला लावलेली मच्छी फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. अर्धा तासानंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्या. तेल थोडे तापलं की सुरमई तेलामध्ये टाकून घ्या. आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून मच्छी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित तळून घ्या. दोन-तीन मिनिटांनंतर मच्छी उलटी करून त्याही बाजूने व्यवस्थित तळून घ्या. मच्छी दोन्ही बाजूनी तळून झाली की एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर मच्छी फ्राय केलेल्या त्याच पॅनमध्ये तयार केलेला मसाला टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मसाला मस्त शिजवून घ्या. दोन ते तीन मिनिटानंतर मसाला शिजला की गॅस बंद करा. आणि तळलेल्या मच्छी ला हा मसाला वरून मस्त लावून घ्या. अशाप्रकारे खाण्यासाठी तयार मस्त चमचमीत अशी सुरमई मसाला फ्राय.

Category

Show more

Comments - 10